Ad will apear here
Next
मराठी अभंग... काश्मिरी युवती शमीमा अख्तर यांच्या आवाजात... (व्हिडिओ)
संतवाङ्मय हे वैश्विक संदेश देणारे, साऱ्या विश्वाच्या भल्यासाठी प्रार्थना करणारे अक्षरवाङ्मय आहे. त्यामुळे त्याला भाषा, धर्म, जात, पंथ किंवा प्रांत अशा कोणत्याही बंधनांत बांधता येत नाही. याची प्रचीती येणारा उपक्रम सरहद म्युझिकने राबवला आहे. काश्मिरी युवती शमीमा अख्तर यांच्या आवाजात काही मराठी अभंगांचे व्हिडिओ सादर करण्यात आले असून, ते रसिकांना आवडत आहेत. 

पुण्यातील संजय नहार यांनी स्थापन केलेली ‘सरहद’ ही संस्था काश्मीरसह भारताच्या विविध सीमावर्ती प्रदेशांमध्ये कार्य करते. या भागातील तरुणांना अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था धडपडते. या संस्थेच्या सरहद म्युझिक या उपक्रमांतर्गत काही मराठी अभंग तरुण काश्मिरी गायिका शमीमा अख्तरच्या आवाजात सादर करण्यात आले आहेत. मजहर सिद्दिकी या काश्मिरी तरुण संगीतकाराने त्याला संगीत दिले आहे. माझे माहेर पंढरी, मोगरा फुलला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा या रचनांचे व्हिडिओ यू-ट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आले असून, ते रसिकांना आवडत आहेत. 

गेल्या वर्षी शमीमा अख्तरने सादर केलेले संत ज्ञानेश्वरांचे पसायदान प्रचंड लोकप्रिय ठरले होते. यंदा हे पसायदान प्रेमनाथ शाद यांनी काश्मिरी भाषेत अनुवादित केले असून, ते प्रांजली नेवासकरने सादर केले आहे. मजहर सिद्दिकी यांनीच त्यालाही संगीत दिले आहे. या उपक्रमातील काही व्हिडिओ येथे शेअर करत आहोत. 











 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YYTMCO
Similar Posts
वंदे मातरम् - काश्मिरी गायक मझहर सिद्दिकी यांचे सादरीकरण (व्हिडिओ) .वंदे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा स्फूर्तिदायी मूलमंत्र बनला तो बंगालचे थोर सुपुत्र व साहित्यिक बंकिमचंद्रांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम् या गीतामुळे! वंदे मातरम् म्हणत क्रांतीवीर हसत फासावर चढले. ते वंदे मातरम् हे गीत सरहद संस्थेने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काश्मिरी युवा गायक आणि
श्री गणपती नामावली गीत : सादरकर्ते - मझहर सिद्दिकी (व्हिडिओ) काश्मिरी युवा गायक आणि संगीतकार मझहर सिद्दिकी यांनी गीताच्या स्वरूपात सादर केलेली श्री गणेश नामावली
धनु ज्ञानियाची : धनश्री गणात्रा यांच्या श्रवणीय, चिंतनीय अभंगांचा ठेवा (व्हिडिओ) प्रसिद्ध गायिका, गीत-लेखिका आणि संगीतकार धनश्री गणात्रा यांनी स्वतः लिहून, संगीत देऊन स्वतःच गायन केलेल्या अभंगांची सीडी ‘धनु ज्ञानियाची’ या नावाने काही कालावधीपूर्वी प्रसिद्ध झाली होती. यंदा आषाढी एकादशीनिमित्त १० दिवस आधीपासून त्यांनी दररोज एका अभंगाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. हा श्रवणीय, चिंतनीय अभंगांचा ठेवा येथे शेअर करत आहोत
देवा... आज महाद्वार तू ओलांडावंस...! देवा, मी कसाबसा आलोय तुझ्या पायाशी.. खरं तर तुझं दर्शन घ्यायला.. पण त्याहीपेक्षा वारकऱ्यांचा निरोप द्यायला.. बाहेरच्या सगळ्या हरिभक्तांसाठी तू आज बाहेर यावंस... त्यांचं सांगणं ऐकावंस... तू त्यांच्यासोबत आहेस.. असं आश्वस्त करावंस.. देवा.... चरणाशी एकच मागणं... आज महाद्वार तू ओलांडावंस..

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language